नागपुरात उद्रेक सुरूच २४ तासात ६९१ बाधित ८ मृत्यू

February 23,2021

नागपूर : २३ फेब्रुवारी - नागपुरात कोरोनाचा प्रकोप सुरूच असून २४ तासात ६९१ बाधित रुग्ण आढळले असून ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४७७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
२४ तासात ६९१ बाधित रुग्ण आढळले असून त्यात शहरातील ५५१ आणि ग्रामीणचे १३८ तर जिल्ह्याबाहेरचे २ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. बाधित रुग्णांची संख्या १४४५३४ वर पोहोचली आहे.  ८ जणांचा मृत्यू झाला आहे त्यात ५ जण शहरातील १ ग्रामीण भागातील २ इतर जिल्ह्यातील आहेत. आज ४७७ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५६ आहे. आज एकूण १०९९६ चाचण्या घेण्यात आल्या त्यात शहरात ६८३०तर ४१६६ चाचण्या ग्रामीण भागात घेण्यात आल्या.