देशातील प्रत्येक घराघरात जिवरक्षक बनला पाहिजे - ऍडमिरल पी.डी. शर्मा

February 22,2021

नागपूर  : २२ फेब्रुवारी - भारत देशात  रस्ते अपघात आणि पाणी व इतर आकस्मिक अपघातामध्ये व विविध आपत्तीमध्ये  दरवर्षी ५ लाख लोक आपला जीव गमावत आहेत .म्हणून भारत देशात प्रत्येक घराघरांमध्ये एक जीवरक्षक  बनला पाहिजे व हे कार्य राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी करेल असा संकल्प ऍडमिरल पी.डी.शर्मा यांनी जिवरक्षक प्रशिक्षक  सप्ताहाचे उदघाटंन प्रसंगी व्यक्त केला .

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी इंडिया च्या वतीने २२ फेब्रुवारी २०२१ ते २७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान एन.एम.सी.क्रीडा संकुल नागपूर येथे सात दिवसीय प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे त्याचे  सप्ताहाचे उदघाटन शर्मा यांच्या हस्ते झाले .

पुढे ते म्हणाले की ,लाईफ सेव्हिंग जीवरक्षक हा विषय शालेय अभ्यासात समावेश करण्यात यावा शिवाय याला क्रीडा स्पर्धा मध्ये ही विचार करण्यात यावा .या वेळी या सप्ताहात  प्रशिक्षणार्थी व विजेत्यांना जीवरक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी ही संस्था गेली 23 वर्ष या क्षेत्रात प्रशिक्षणाचे व आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य करीत आहे.आतापर्यंत देशभरातील 28 राज्यात या संस्थेने 6 लाखापेक्षा अधिक लोकांना प्रशिक्षण देऊन "जीवरक्षक" बनविले आहे .हा नवा विक्रम या संस्थेने केला आहे.नागपुरात होणाऱ्या या सप्ताहात प्रथोमोपचार प्रशिक्षण ,तलावातील व समुद्रातील बुडणाऱ्या नागरिकांना वाचवण्यासाठी विशेष जीवरक्षकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.व्यवस्थापन व प्रक्रिया तसेच रस्ता सुरक्षा जीवरक्षक प्रशिक्षण ,जीवरक्षक क्रीडा स्पर्धा प्रशिक्षण व तयारी  तसेच आशा विविध जीवरक्षक स्पर्धेचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे .

या सप्ताहात प्रथमोपचार तद्द कांचन म्हात्रे ,तरुण मुर्गेश ,जलतरण आपत्ती तद्द टॉम जोसेफ ,पार्था वाराणसी ,कौस्तुभ बक्षी ,जेकेब विजयकुमार यासारखे नामवंत तद्द प्रशिक्षण देणार आहेत.तरी या उपक्रमाचा लाभ विद्यार्थी ,युवक व नागपूरकर नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात येत आहे.

या सप्ताहाचे आयोजन राष्ट्रीय लाईफ सेव्हींग सोसायटी च्या वतीने करण्यात आले आहे . .त्याबरोबरच संस्थेचे प्रमुख कविता शर्मा ,प्रफुल्ल पांड्ये , कौसतुभ झिरपे ,निरंजन कुलकर्णी ,विरोत्मा डानियाल यावेळी उपस्थित होते.