महापालिकेच्या स्थायी समितीच्या ८ सदस्यांची निवड

February 22,2021

नागपूर : २२ फेब्रुवारी : नागपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये स्थायी समितीच्या निवृत्त होणा-या ८ सदस्यांच्या जागी नविन ८ सदस्यांची निवड करण्यात आली. मनपाची विशेष सभा डॉ.पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

भा.ज.पा.तर्फे सत्तापक्ष नेता  संदीप जाधव यांनी  प्रकाश भोयर, संजय बालपांडे, सुषमा चौधरी, प्रगती पाटील, भारती बुंडे,  काँग्रेस तर्फे विपक्षचे नेते  तानाजी वनवे यांनी नेहा राकेश निकोसे व मनोज गावंडे तसेच ब.स.पा.तर्फे पक्ष नेता  वैशाली नारनवरे यांनी बंद लिफाफयात नरेन्द्र वालदे यांचे नांव महापौरांना दिले.  सचिव  रंजना लाडे यांनी या नावांचे वाचन केले. यामध्ये भा.ज.पा.चे ५, काँग्रेसचे २ व ब.स.पा.चे १ सदस्याच्या समावेश आहे.

यानंतर सत्तापक्ष नेता  जाधव यांनी स्थायी समितीचे उर्वरित ७ नावांची घोषणा केली. यामध्ये सुमेधा देशपांडे, वर्षा ठाकरे, वनिता दांडेकर, स्वाती आखतकर, रूपाली ठाकुर, वंदना भुरे, जयश्री लारोकर यांचा समावेश आहे. प्रकाश भोयर यांना स्थायी समिती सभापती पदाचे उम्मेदवार घोषीत करण्यात आले आहे. त्यांनतर नागपूर महानगरपालिकेच्या दहा विशेष समिती चे सदस्यांची नाव घोषीत करण्यात आले. सोमवारी (ता.२२) ऑनलाईन पद्धतीने झालेल्या मनपाच्या विशेष सभेमध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी दहाही विशेष समिती सदस्यांचे नाव घोषित केले. या समितीच्या सदस्यांची निवडणूक १ मार्च पूर्वी घेण्याचे निर्देश महापौरांनी सचिवालयाला दिले.

सत्तापक्ष नेता संदीप जाधव यांनी या विशेष समितीच्या सभापती पदाचे उम्मेदवारांचे नावांची घोषणा केली. यामध्ये शिक्षण समिती सभापतीपदी प्रा. दिलीप दिवे तर कर संकलन व कर आकारणी समिती सभापतीपदी महेंद्र धनविजय यांना कायम ठेवण्यात आले आहे. स्थापत्य समिती सभापती म्हणून राजेंद्र सोनकुसरे, जलप्रदाय समिती सभापतीपदी संदीप गवई, विधी समिती सभापतीपदी ॲड. मिनाक्षी तेलगोटे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दिव्या धुरडे, अग्निशमन व विद्युत विशेष समिती सभापतीपदी दिपक चौधरी, दुर्बल घटक समिती सभापतीपदी कांता रारोकर आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती म्हणून हरीश दिकोंडवार, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती संजय महाजन यांची निवड करण्यात आलेली आहे.