जहाल नक्षलवादी गुड्डू कुडयामी याला अटक

February 22,2021

नागपूर : २२ फेब्रुवारी - गडचिरोली जिल्ह्यात घातपाती कारवाया करण्यासाठी कुख्यात असणारा जहाल नक्षलवादी गुड्डू राम कुडयामी याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना आज यश आले आहे. सी-६० च्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे या जहाल नक्षलवाद्याला त्यांनी अटक केली. 

गुड्डू हा २०१७ मुक्कबेली आरपीसी मिलिशिया प्लाटून मध्ये भरती झाला होता. भरमार हत्यार तो नेहमी सोबत बाळगत होता २०२० साली वाहन जाळपोळीमाधव त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच छत्तीसगड मध्ये झालेल्या घातपाती कारवायामध्येही त्याचा हात होता.  त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी आज त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून  अटक केली आहे. गेल्या १५ दिवसात गडचिरोली पोलिसांनी ३ जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे.