वाशिममध्ये अपघातात एक ठार

January 27,2021

वाशिम : २७ जानेवारी - वाशिम जिल्ह्यातील नागपूर - वाशिम या महामार्गावर धानोरा नजीक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर आणखी एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

धानोरा इथं इचोरा फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात मोतसावंगा येथील संतोष जामकर ( वय 22 वर्षे ) या युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला असून आजगांव येथील गजानन साखरे ( वय 25 वर्षे ) हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

अपघातानंतर घटनास्थळावरून अज्ञात वाहनासह चाक फरार झाला असून गंभीर जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, नवनिर्मित महामार्गामुळे अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गतीवर नियंत्रण नसणे, ओव्हरटेकचा प्रयत्न आणि वाहन चालवताना इतर नियमांचं पालन न करणं, अशा कारणांमुळे हे अपघात होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे असे अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी सतर्कता बाळगण्याची गरज वारंवार अधोरेखित होत आहे.