प्रजासत्ताकदिनी मेट्रोला उत्स्फूर्त प्रतिसाद

January 27,2021

नागपूर : २७ जानेवारी - काल दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नागपूर मेट्रो रेल प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली काल तब्बल ५६,४०६  नागरिकांनी नागपूर मेट्रोच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. हा आता पर्यंतचा सर्वात मोठा ऊंचाक असून या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे जो कि या पूर्वीच्या रेकॉर्ड रायडरशिप पेक्षा ३ पटीने जास्ती आहे. महत्वपूर्ण म्हणजे काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने मेट्रो सेवा रात्री ९ वाजता पर्यंत उपलब्ध होती. 

या पूर्वी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची सर्वात जास्त रायडरशिप २७ डिसेंबर २०२० रोजी २२१२३ नोंदविण्यात गेली होती. नागपूर मेट्रोची २६ जानेवारी २०२१ रोजीची रायडरशिप देशातील इतर मेट्रो रेल प्रकल्पाच्या तुलनेत अग्रणीय होती. काल मोठ्या प्रमाणता मेट्रो स्टेशन येथे गर्दी आढळून आली व सिताबर्डी इंटरचेंज येथे जे कि जास्ती होती व तिकीट खरेदी करण्याकरता मोठ्या रांगा लागल्या होत्या. कॉनकोर्स येथे सकाळ पासून रात्री पर्यंत सतत मेट्रोने प्रवास करायची गर्दी आढळून आली.