रस्ता अपघातात महिला ठार

January 27,2021

नागपूर : २७ जानेवारी - वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पेंडरला अज्ञात वाहनचालकाने भरधाव वाहन चालवून धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गणेश बावनकर आपल्या वहिनीला व पुतणीला मोटारसायकलने सुराबर्डी येथून घरी घेऊन येत असताना वडधामना ते वानाडोंगरी रोडवर एका ट्रकच्या मागे असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुचाकीचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारसायकलला धडक दिली या धडकेत गणेश बावनकर व त्याची  पुतणी अंकिता गंभीर जखमी झाली तर वनिता बावनकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध  गुन्हा दाखल केला.