सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद मिश्रा यांना राष्ट्रपतींचे सन्मानपदक

January 27,2021

नागपूर : २७ जानेवारी - प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्य आणि पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना दरवर्षी राष्ट्रपतींतर्फे वेगवेगळे पदक देऊन गौरवण्यात येते. यंदा महाराष्ट्राला राष्ट्रपतींचे ४ पोलीस पदक आणि ५३ पोलीस पदक मिळाले आहेत. असा सन्मान मिळवणाऱ्यांमध्ये नागपुरातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद मिश्रा यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात मिळालेल्या ४ राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये विदर्भाच्या एकाही अधिकाऱ्याचा समावेश आहे.  उल्लेखनीय सेवेसाठी जाहीर झालेल्या ४०  पोलीस पदकांमध्ये विदर्भातील  भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत उत्तमराव जाधव, बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षक राजेश बाबुलाल नागरुरकर, चंद्रपूर येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लीलेश्वर गजानन वऱ्हाडमारे, अमरावती येथील अशोक कमलाकर मांगलेकर, चंद्रपूरचे विजय नामेदवराव बोरीकर, अमरावतीचे पुरुषोत्तम शेषरावजी बारड, नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याचे शारदाप्रसाद ऊर्फ शरद रमाकांत मिश्रा आणि सिरोंचा, गडचिरोली येथील गुप्तचर अधिकारी राजू इरका उसेंडी यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च कामगिरीसाठी पदकांची घोषणा सोमवारी करण्यात आली. यामध्ये नागपूर महापालिकेतील अग्निशमन सेवेतील  निवृत्त सहायक स्टेशन अधिकारी धनराज नारायणराव नाकोड यांना अग्निसेवा पदक जाहीर झाले आहे. ते ३० नोव्हेंबर २०२० रोजी ते निवृत्त झाले होते. नाकोड यांनी २००१ साली गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या मोठय़ा भूकंपाच्या वेळी नाकोड यांना शोध्, बचाव मोहिमेत तैनात करण्यात आले होते. २०१२ मध्ये वर्षी ३ डिसेंबर रोजी बहुमजली कोल्ड स्टोरेज बिल्डिंग कोसळलेल्या ठिकाणी त्यांनी बचाव कार्याचे नेतृत्व केले व मोडकळीस आलेल्या इमारतीत घुसून त्यांनी चार जणांचे प्राण वाचवले.