दहशतवादी हल्ल्यात ४ जवान जखमी

January 27,2021

श्रीनगर : २७ जानेवारी - दहशतवाद्यांनी आज(बुधवार) दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील शम्सीपोरा भागात कुरापत केल्याचं समोर आलं. भारतीय लष्कराच्या रोड ओपनिंग पार्टीवर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत.

जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लष्कराच्या प्रवक्त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

तर, ग्रनेड हल्ल्याच्या घटनेनंतर जवानांनी संबंधित परिसरास वेढा दिला व दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

मागील महिन्यात सौरा येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांचा उपचारादरम्यान एसकेआयएमएस रुग्णालायता मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.