भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव पोलीस पदकाचे मानकरी

January 27,2021

भंडारा : २७ जानेवारी - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उल्लेखनीय आणि विशेष कार्य करणाऱ्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पुरस्काराची घोषणा करण्यात येते. भंडारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांना प्रसंशनीय सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. 

राज्यातील 57 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध प्रकारची पदके घोषित करण्यात आली. त्यात 40 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक देण्यात आले. भंडारा जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांचाही समावेश आहे. भंडाऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होण्यापूर्वी ते मुंबई येथे कार्यरत होते. वसंत जाधव यांनी जिल्ह्यात यापूर्वी अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणूनही कर्तव्य बजावले आहे.