आजाद समाज पार्टी चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पँथर राहुल भाई प्रधान यांची नागपुर येथे भीम आर्मी कार्यकर्त्यांशी चर्चात्मक बैठक संपन्न

January 27,2021

महाराष्ट्राचे प्रखर वक्ते, निढर कार्यकर्ते, पँथर राहुल भाई प्रधान यांचे नागपुर येथे सकाळी आगमन झाले. सकाळी ११.०० दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिला अभिवादन केले. व नियोजीत कार्यक्रमास हजेरी लावली. भीम आर्मी नागपुर जिल्हा तर्फे ग्रामीण व शहरी भागातील सर्व भीम आर्मी कार्यकर्त्यांसोबत दुपारी २.३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी पँथर राहुल भाई प्रधान यांची निवड झाल्यामुळे त्यांचे नागपुर जिल्हा भीम आर्मी तर्फे स्वागत करण्यात आले. सदर बैठकीला कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पँथर राहुल प्रधान यांनी भीम आर्मी सामाजिक संघटन व आजाद समाज पार्टी ची भूमिका स्पष्ट केली. सदर चर्चात्मक बैठकी करीता भीम आर्मी नागपुर जिल्हा अध्यक्ष प्रफुल शेंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती मध्ये वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष सम्राट गजभिये,जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अजय भीमटे,जगदीश डवरे,जिल्हा संघटक सचिव आस्तिक बागडे,नागपूर शहर उपाध्यक्ष रोहित नांदेश्वर,नरेंद्र शेंडे,दक्षिण नागपूर अध्यक्ष अंकुर भाऊ दुपारे,पश्चिम नागपूर अध्यक्ष बादल बागडे,नरखेड तालुका अध्यक्ष वसंता पाटील,कळमेश्वर महिला विंग अध्यक्ष ममता दहिवले,बुद्धा बागडे,आकाश बन्सोड,राजेंद्र बागडे,  संजय फुलझेले,सूरज पाटील,अमोल कुमार चिमनकर,कुणाल यांच्या प्रमुख उपस्थतीत कार्यक्रम पार पडला. सदर आयोजीत बैठकी करीता नागपुर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील विविध कार्यकर्ते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बादल श्रीरामे यांनी केले.