ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी तरुणीची काढली घोड्यावरून मिरवणूक

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी - राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीची पार पडली आहे. ग्रामपंचायत निकालातील वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत. युवकांपासून ते जेष्ठ नागरिकांचा सहभाग ग्रामपंचायत निवडणुकीत दिसू आला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विविध ठिकाणी करण्यात आलेला जल्लोष राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूर जिल्ह्यातील उमेरड तालुक्यातील शीतल सहारे हिची घोड्यावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली. शीतल सहारे यांच्या विजयानंतर गावकऱ्यांनी केलेला जल्लोष चर्चेचा विषय ठरत आहे. शीतल सहारेच्या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

शीतल सहारे ही उमरेड तालुक्यातील सावंगी खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभी राहिली होती. शीतलने 24 व्या वर्षीचं ग्रामपंचायतीच्या कारभारात एन्ट्री मिळवलीय. सावंगी खुर्दच्या ग्रामस्थांनी शीतल सहारेच्या विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. शीतल विजयी झाल्यानंतर तिची थेट घोड्यावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली. शीतल सहारे सावंगी ग्रामपचांयतीमध्ये अनुसूचित जमाती संवर्गातून विजयी झाली आहे.

सावंगी खुर्दच्या ग्रामस्थांनी शीतल सहारे हिच्या विजयाचा जल्लोष अनोख्या पद्धतीनं साजरा केला. गावकऱ्यांनी शीतलची घोड्यावरुन काढली. सावंगी खुर्दच्या ग्रावकऱ्यांनी केलेल्या अनोख्या जल्लोषाची चर्चा सर्वत्र रंगली होती.