दुचाकीवाहनाच्या डिक्कीतून चोरट्याने केले ५० हजार रुपये लंपास

January 20,2021

यवतमाळ : २० जानेवारी - कापूस विक्रीतून आलेले ५० हजार रुपये बँकेतून काढून घराकडे जात असताना चालल्या दुचाकी वाहनांच्या डिक्कीमधून चोरट्याने पैसे लंपास केल्याची घटना घाटंजी येथील मेन लाइन परिसरातील अग्रसेंन ज्वेलरी या दुकानाजवळ घडली. हा सर्व प्रकार परिरातील दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. 

शेतकरी अनिल ठाकरे यांनी आपल्या कापूसाची विक्री केली होती. यातून मिळालेली रक्कम त्यांनी मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा झाली होती. त्यांना काही कारणास्तव पैसाची गरज असल्याने, ते मंगळवारी दुपारी मध्यवर्ती बँकेत आले आणि त्यांनी बँकेतून ५० हजार रुपयाची रक्कम काढली. 

पैसै घेऊन अनिल ठाकरे आपल्या दुचाकीने घरी निघाले. घाटंजी मेन लाइन परिसरात आल्यानंतर चोरट्याने पाळत ठेऊन अनिल ठाकरे यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले पैसे चालत्या गाडीमधून पळवले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला करीत आहेत.