कोरोनाच्या कॉलरट्यूनमुळे देशातील नागरिकांचा कोट्यवधी तसंच वेळ वाया गेला

January 20,2021

नवी दिल्ली : २० जानेवारी - कोरोनाच्या ३0 सेकंदाच्या कॉलरट्यूनमुळे देशातील कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांचे एकत्रितरित्या तीन कोटी तास वाया जात असल्याचे एका अग्रगण्य ग्राहक संस्थेने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. 

ही कोरोना कॉलर ट्यून आतापयर्ंत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात होती. परंतु आता ती रद्द करण्यात आल्याची माहिती सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयास देण्यात आली. एका जनहित याचिकेद्वारे अमिताभ यांच्या आवाजातील या कॉलरट्यूनबाबत आक्षेप घेण्यात आला होता. ही कॉलर ट्यून मोठया प्रमाणावर त्रासदायक असल्याचे म्हटले आहे. सर्व मोबाइल नेटवर्कवरून ती ऐकवली जाते. आपत्कालीन परिस्थितीत ही कॉलर ट्यून त्रासदायक ठरते, कारण वापरकर्त्यांला फोन त्वरित स्वीकारला जाणे अपेक्षित असताना नाहक कॉलर ट्यून ऐकावी लागते. . त्याच्या महत्त्वाच्या कामातही व्यत्यय येतो आणि त्यास उशीर होतो तो वेगळाच, असे या संस्थेचे निरीक्षण आहे. प्रसिद्ध ग्राहक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून करोना कॉलर ट्यून ऐकवण्यामुळे वाया जाणार्या वेळेची माहिती जमवण्यात आली आहे. 

या ग्राहक संस्थेने या संदर्भात ग्राहक संरक्षण आणि दूरसंचार मंत्रालयाशी त्याचबरोबर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाशी (ट्राय) संपर्क साधला. याबाबत ट्रायने प्रतिसाद दिला. ट्रायचे अध्यक्ष पी. डी. वाघेला म्हणाले की, करोना साथीशी संबंधित संदेशांची अनेकदा पुनरावृत्ती होते. शिवाय कालबाह्य कॉलर ट्यून हे त्रासाचे साधन बनले आहे. मोबाइल वापरकर्ते अशा संदेशांकडे मोठय़ा प्रमाणात दुर्लक्षही करतात. आता लोक सामाजिक अंतर नियम आणि मुखपट्टय़ांच्या वापरण्याबाबत जागरूक झाले आहेत. कोरोनाविषयक संदेश ट्यून आता जनजागृती करण्याचे साधन राहिलेले नसून या ट्यूनमुळे आपत्कालीन कॉल घेण्यासाठी ३0 सेकंदांची वाट पाहावी लागते, असे मत एका माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञाने मांडले. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ यांच्या आवाजातील ३0 सेकंदांचा कोरोना संदेश ऐकण्यात कोट्यावधी मोबाइल वापरकर्त्यांनी अनेक महिने दिवसांचे अनेक तास वाया घालवले. आता अमिताभ यांच्या जागी कलाकार जसलीन भल्ला यांच्या आवाजातील लसीकरणाचा संदेश देणारी नवी कॉलर ट्यून ऐकवण्यात येत आहे.