ट्रक झाडाला धडकल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती जागीच मृत

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी - समोरून येणार्या अज्ञात वाहनाने आयसर ट्रकला जोरदार धडक दिल्यामुळे ट्रक झाडाला धडकून ट्रकचा वाहकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर चालकाला गंभीर जखमी अवस्थेत नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना रात्री उमरेड पोलिस स्टेशन हद्दीतील मौजा हेटी शिवारामधील उमरेड ते नागपूर रोडवर घडली. मृतकाचे नाव ज्ञानेश्वर मोतीराम उईके आहे.

प्राप्त माहितीनुसार, उमरेड पोलिस स्टेशन हद्दीतील मौजा हेटी शिवारामधील उमरेड ते नागपूर रोडवर रात्री ८.३0 दरम्यान आयसर ट्रक क्र. एमएच/३१/एफसी/३५८१ हा गडचिरोलीवरून नागपूरला जात असताना समोरून येणार्या अज्ञात वाहन चालकाने आयसर गाडीला समोरून धडक मारली. यामुळे आयसर चालकाने नियंत्रण सुटून त्यांनी उभ्या झाडाला जबर धडक मारल्याने आयसर गाडीतीलवाहक ज्ञानेश्वर मोतीराम उईके (४५) रा. तोंडाखैरी त. कळमेश्वर, जि. नागपूर हा जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर आयसर चालक सारंग लोही हे गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहे. अज्ञात वाहन चालक पसार झाला आहे. शुभम ज्ञानेश्वर उईके (२६) रा. तोंडाखैरी त. कळमेश्वर जि. नागपूर यांच्या तक्रारीनुसार उमरेड पोलिसांनी अज्ञात वाहन चालकांवर कलम २७९, ३३७, ३३८, ३0४(अ) भादंवि आर. डब्ल्यू. १८४, १३४ मोकाका अतंर्गत गुन्हा नोंदविला आहे.