अकोल्यात देशी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त

January 20,2021

अकोला: २० जानेवारी - दहशतवाद विरोधी पथकाद्वारे आज लक्झरी बसस्थानक परिसरातून एक देशी कट्टा तसेच दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सराईत गुन्हेगार सय्यद आसिफ सैय्यद अब्बास रा.भगतवाडी यास अटक करण्यात आली आहे. 

लोकांना देशी कट्टा दाखवून लुटण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या सय्यद आसिफ सैय्यद अब्बास यास मंगळवारी गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रोख सहा हजार, देशी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. त्याने हा कट्टा कुठून हस्तगत केला तसेच तो लक्झरी बस स्थानकावर नेमके काय करत होता याचा शोध पोलिस घेत आहे.अकोला: २० जानेवारी - दहशतवाद विरोधी पथकाद्वारे आज लक्झरी बसस्थानक परिसरातून एक देशी कट्टा तसेच दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सराईत गुन्हेगार सय्यद आसिफ सैय्यद अब्बास रा.भगतवाडी यास अटक करण्यात आली आहे. 

लोकांना देशी कट्टा दाखवून लुटण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या सय्यद आसिफ सैय्यद अब्बास यास मंगळवारी गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून रोख सहा हजार, देशी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. त्याने हा कट्टा कुठून हस्तगत केला तसेच तो लक्झरी बस स्थानकावर नेमके काय करत होता याचा शोध पोलिस घेत आहे.