निवडणुकीच्या वादातून माजी शिवसेना जिल्हाप्रमुखाला मारहाण

January 17,2021

बुलडाणा : १७ जानेवारी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून बुलडाण्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांना मारहाण झाली. मारहाणीत दत्ता पाटील जखमी झाले. पाटील यांच्या कुटुंबीयांनाही यादरम्यान मारहाण झालीय. जळगाव जामोद तालुक्यातील उसरा बुद्रुकमध्ये  सायंकाळी ही घटना घडली. या घटनेत दत्ता पाटील जखमी झाले. 

निवडणुकीत मतदान करण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादात त्यांना मारहाण झाली. शिंबरे कुटुंबीयांनी दत्ता पाटील यांच्या घरावर हल्ला करून त्यांना लाठ्या-काठ्यांनी तसंच फावड्यानं मारहाण केल्याची तक्रार अनिकेत पाटील यांनी केलीय. मारहाणीदरम्यान एकानं पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केली. तसंच महिलांशीही गैरवर्तन केल्याचंही तक्रारीत म्हटलंय. 

या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीकृष्ण हरीभाऊ शिंबरे, प्रमोद उर्फ बाळु श्रीकृष्ण शिंबरे, श्रीकांत श्रीकृष्ण शिंबरे, धनंजय शिंबरे, चेतन शिंबरे, यश प्रमोद शिंबरे, सौ. शालिनी श्रीकृष्ण शिंबरे, निता प्रमोद शिंबरे, कल्पना धनंजय शिंबरे, कांचन श्रीकांत शिंबरे सर्व रा. उसरा बु. यांच्या विरुध्द कलम ३०७, ३९७, ३९८, ४५२, ३५४, ३५४ ब, १४३,१४४, १४९, २९४, ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.