राज्यपालांनी घेतली विदर्भातील कुलगुरुंची भेट

January 17,2021

नागपूर : १७ जानेवारी - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सध्या नागपुर दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी विदर्भातील विद्यापीठांच्या  कुलगुरुंची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यापीठात सुरु असलेल्या विविध प्रकल्पांविषयी माहिती जाणून घेतली. 

ग्रामीण भागातील उत्पादनाला आवश्यक संशोधनाची जोड देण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्यपालांनी सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष  चौधरी, आणि प्र-कुलगुरू संजय दुधे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.  आशिष पातुरकर यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या उन्नत भारत अभियानाच्या  प्रगतीचा आढावा घेतला. 

यावेळी विद्यापीठाद्वारे या प्रकल्पावर नेमके किती काम करण्यात आले, याबाबत विचारणा केली. यावली कुलगुरूंनी आपापल्या  विद्यापीठांमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती सादर केली.