पहिली स्वदेशी मशीन पिस्तूल बनवण्याचा मान मिळाला नागपूरच्या ले. कर्नल प्रसाद बनसोड यांना

January 17,2021

मुंबई : १७ जानेवारी - अम्मी ही  भारताची पहिली स्वदेशी मशीन पिस्तूल (मशीनगन प्रमाणे गोळ्या झाडणारी) तयार करण्याची कामगिरी नागपूरच्या ले. कर्नल प्रसाद बनसोड यांनी चार महिन्यांच्या विक्रमी वेळेत केली आहे. अत्यंत स्वस्त आणि अत्याधुनिक अश्या या मशिनपिस्तूलचा सेने दलांना उपयोग होणार आहे. 

महूच्या इन्फ्रंट्री स्कुलमधील बनसोड यांनी पुण्याच्या आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (जेआरडीइ) च्या सह्कजार्याने हे मशीन पिस्तूल तयार केले आहे. मेटल थ्रीडी प्रिंटिंग तंत्राने बनवलेल्या या मशिनपिस्तूलमध्ये उच्च दर्जाचे ऍल्युमिनिअम  आणि कार्बन फायबर वापरण्यात आले आहे. आठ इंच बॅरेल (नळकांडे) असलेल्या या पिस्तूलमध्ये ३३ गोळ्या झाडू शकणारे मॅगझीन आहे. 

मॅगझीन आणि गोळ्यांशिवाय बंदुकीचे वजन दोन किलो आहे. आकाराने छोटी असलेली ही मशिनपिस्तुल हाताळायला सोपी आहे. ति सर्व प्रकारच्या सैनिकांना  सोईस्कर ठरेल.