५ एकरातील तुरीला लागली आग

January 17,2021

अमरावती : १७ जानेवारी  - अमरावती जिल्ह्यातील पूर्णानगर येथील प्रकाश सिंग ठाकूर यांच्या पाच एकर शेतात काढणी केलेल्या तुरीला आग लागली. काल रात्री ही घटना घडली. तुरीच्या गंजीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीमुळे प्रकाशसिंग ठाकूर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

प्रकाशसिंग ठाकूर यांनी यावर्षी आपल्या पाच एकर शेतात तूर व अन्य पिकाची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी तूर काढून वाळण्यासाठी शेतात त्याची गंजी लावून ठेवली होती. काल (शनिवारी) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास या गंजीला आग लागले. आग लागल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत आग पूर्णपणे पसरली होती. या आगीत पाच एकर क्षेत्रातील तूर जळून भस्मसात झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग लागली की कोणी जाणीवपूर्वक लावली याचा तपास पोलीस करत आहेत.