भीषण अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी

January 17,2021

यवतमाळ : १७ जानेवारी - कळंब राळेगांव रोडवरील आमला येथे काल रात्री १0 च्या सुमारास झालेल्या भिषण अपघातात एक जागीच ठार तर अतिशय गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मरणपावल्या ईसमाचे नांव नंदु मनोहर राऊत (वय ४५) तर गंभीर जखमी झालेल्या ईसमाचे नांव शैलेश नंदा गवळी (वय २६) असे आहे दोन्ही ईसम रा. तिरझडा येथील आहे. कळंब येथील आपले काम आटोपून आपल्या घरी जात असतांना आमला गावातील बसस्टॉपवर थंडीमुळे थांबले असताना काळाने त्याच्यावर झडप घातली कळंबवरुन येत असलेल्या अज्ञान वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन्ही इसमाला जबर धडक दिली त्यात एक जागीच ठार तर गंभीर जखमी झाला आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी तत्काळ गावकर्यांनी धाव घेतली व मोलाचे सहकार्य केले घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली काही काळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास कळंब पोलिस करीत आहे.