सुपर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग, सुदैवाने जीवित हानी नाही

January 17,2021

यवतमाळ : १७ जानेवारी - वणी येथील नांदेपेरा रोडवरील सेवन स्टार सुपर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली.  सायंकाळी ७.३0 वाजता दरम्यान लागलेल्या या आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठी हानी टळली.

प्राप्त माहितीनुसार नेहमीप्रमाणे सेवन स्टार सुपरबाजारमध्ये ग्राहक समान खरेदी करीत होते. दरम्यान, मॉलच्या दुसऱ्या  मजल्यावर स्थित डकटिंग कुलरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. मॉलच्या बाजूलाच महावितरणचे कार्यालय असून तेथील कर्मचार्यांनी तत्काळ वीज पुरवठा बंद केला. 

मॉलच्या डाव्या बाजूला स्थित दुकानच्या छतावर चढून काही युवकांनी जळत्या कुलरवर पाणीचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीचे रौद्र रुप पाहता परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्याने मोठी हानी टळली.