जिल्हा नियोजन समितीची बैठक आता 23 जानेवारीला

January 13,2021

नागपूर : १३ जानेवारी - जिल्हा नियोजन समितीची  15 जानेवारीला होणारी सभा आता शनिवार, 23 जानेवारी रोजी दुपारी  एकला सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी कळवले आहे. 

या वर्षातील ही महत्वपूर्ण बैठक असून या बैठकीमध्ये पुढील वर्षाच्या नियतव्ययावरही चर्चा होणार आहे. तसेच कोरोना काळामध्ये अनेक विभागांमार्फत झालेल्या खर्चाचा आढावाही या बैठकीत घेतला जाणार आहे.  पुढील वर्षासाठी केलेल्या नियोजनासंदर्भात यापूर्वी अंतर्गत समितीच्या दोन बैठका घेऊन पालकमंत्र्यांनी आढावा घेतला आहे.  आता 23 जानेवारीच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय होणार आहे.