दोन दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू , तीन जखमी

January 13,2021

चंद्रपूर : १३ जानेवारी - भरधाव धावणाऱ्या  दोन दुचाकींची समोरा समोरा धडक झाल्याने दोंघाचा मृत्यू तर तीन जखमी झाल्याची घटना मूल ताडाळा मार्गावर महाबीज केंद्राजवळ घडली. 

प्राप्त माहितीनुसार,  दुपारी १२ वाजताचे सुमारास स्वप्नील गुज्जनवार (२८) रा. रामपूर (मूल) हा लोभान रामटेके रा. केळझर याचे सोबत फॅशन प्रो (क्र. एचएम-३४- एफवाय-९५३७) ने मूल वरून ताडाळाकडे खाजगी कामासाठी जात होता. त्याच दरम्यान गडीसुर्ला येथील चंद्रशेखर निकुरे, रविंद्र कावळे आणि अनिल झरकर हे तिघेजन सिडी होंडा (क्र. एमएच-३४ - ९७११) या मोटार सायकलने गडीसुर्ला येथून मूलकडे येत होते. प्रत्यक्षदश्रीच्या सांगण्याप्रमाणे दोन्ही दुचाकी भरधाव वेगात होत्या. एकमेकांना बाजू देत असतांना भरधाव धावणार्या दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्याने समोरा समोर धडक झाली. यामध्ये स्वप्नील गुज्जनवार रा. रामपूर हा अपघातस्थळीच मृत्यु पावला तर दुसरा दुचाकीस्वार रविंद्र कावळे (३३) रा. गडीसुर्ला याच उपचारा दरम्यान दवाखाण्यात मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या अनिल झरकर, (२५) रा. चक फुटाणा, चंद्रशेखर निकुरे (२२) रा. गडीसुर्ला आणि लोभान रामटेके (२८) रा. केळझर या तिघांवर उपजिल्हा रूग्णालय येथे उपचार सुरू आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार पोलिस निरिक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक डोंगरे, पोहेका शेंन्डे, श्रीधर मडावी हे करीत आहेत.