प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजाविरोधात मनपाची कारवाई

January 12,2021

नागपूर : १२ जानेवारी : संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. मंगळवारी (ता.१२) दोन झोनमध्ये केलेल्या दोन कारवाईच्या माध्यमातून सुमारे दोन हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.१२) हनुमान नगर झोनअंतर्गत एन व आशीनगर झोनअंतर्गत एक कारवाई करण्यात आली. या माध्यमातून ‍दोन हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ३५ नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली. आतापर्यंत ३९ कारवाईच्या माध्यमातून सुमारे १३४८ पतंगे, ११ चक्री मांजा जप्त करुन रु. ३९,०००/- चा दंड वसूल करण्यात आला.