महाराष्ट्रातील विद्यमान सरकार अल्पकाळ टिकणारे - भाजप प्रभारी सी. टी. रवी

December 03,2020

नागपूर : ३ डिसेंबर - महाराष्ट्रातील सरकार फारकाळ अस्तित्वात राहणार नाही, ते नागरिकांचे अल्पकाळाचे साथीदार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय महासचिव व प्रदेश भाजपाचे केंद्रीय प्रभारी आ. सी. टी. रवि यांनी यांनी केले.

महाराष्ट्र भाजपाचे केंद्रीय प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ते नागपूर दौèयावर आले आणि त्यांनी सर्वप्रथम रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसराला भेट दिली. या भेटीत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या प्रतिमेला तसेच द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले.

 यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यात, संघस्थळ हे प्रेरणास्थान आहे, त्यामुळे नवी जबाबदारी आल्यानंतर सर्वप्रथम प्रेरणास्थळाचे दर्शन घेण्यासाठी नागपुरात आलो असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाबाबत विचारले असता, नंबर गेमच्या आधारे किती दिवस हे सरकार टिकणार हा एक सवालच आहे. केवळ संख्या कारणीभूत ठरत नाही, जनतेचा विश्वास देखील आवश्यक आहे. उद्या निवडणुकांचे निकाल आहेत. त्यातून सरकारला आपल्या अस्तित्वाविषयी संकेत मिळतील.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौèयाच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सत्तापक्ष आंदोलन करीत आहेत असे विचारले असता, आंदोलन आणि आरोप करण्यापेक्षा या सरकारने त्यांच्यासारखे काम राज्यात करुन दाखवावे असे आव्हान देखील सी. टी. रवि यांनी शासनाला दिले.

 गोहत्या प्रतिबंधक कायदा आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्यासंदर्भात विचारले असता, महाराष्ट्रात सध्या भाजपाचे राज्य नाही, ते आल्यानंतर उत्तरप्रदेश पॅटर्नवर दोन्ही कायद्यांचा निपटारा करु असा विश्वास सी. टी. राव यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शहर भाजपाध्यक्ष आ. प्रवीण दटके, माजी खासदार अजय संचेती, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. विकास कुंभारे, डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.