पुसदची चंचल तिवारी मिस इंडिया दिल्ली वल्ड २०२० मध्ये देशात दुसरी

December 03,2020

यवतमाळ : ३ डिसेंबर - अतिशय सामान्य कुटुंबातील अकरावीत शिकणाèया चंदनिका चंचल तिवारी या पुसदकन्येने दिल्ली येथे आयोजित मिस इंडिया दिल्ली वल्ड  २०२० या स्पर्धेत देशभरातून द्वितीय स्थान पटकावले. तिला सिनेअभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते चमकदार मुकुट व आकर्षक पदक प्रदान करण्यात आले. तिच्या या यशाने पुसदच्या गौरवात भर पडली आहे.

स्कायवॉक प्रॉडक्शनच्या वतीने ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात गुडगाव येथील द वेस्टीन हॉटेल मध्ये झाली. या ‘मिस, मिस्टर, मिसेस इंडिया दिल्ली वल्र्डङ्क स्पर्धेसाठी आभासी चाचणी घेण्यात आली. देशभरातून १ लाख ८६ हजार स्पर्धकांनी त्यात सहभाग नोंदविला. त्यापैकी १०८ स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यात चंदनिका होती. या स्पर्धकांचे १५ दिवस ‘ग्रूqमगङ्क प्रशिक्षण झाले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून चंदनिका उपविजेती ठरली.

 पुसदच्या वसंतनगरसारख्या ग्रामीण भागातील चंदनिका तिवारीचे देशाच्या राजधानीतील दिमाखदार यशाबद्दल कौतुक होत आहे. तिला लहानपणापासूनच नृत्य, अभिनयात गोडी व गती आहे. तिची मोठी बहीण सुकन्याने स्कायवॉक प्रॉडक्शनची जाहिरात बघितली व चंदनिकाने भाऊ सौरभने घरीच मोबाईलवर काढलेली तिची चार छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठविली.

आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या चंदनिकाची निवड झाली व प्रशिक्षणासाठी तिला दिल्लीला बोलावण्यात आले, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘टॅलेंटङ्क दाखविण्याची हीच संधी आहे, ही खूणगाठ मनाशी बांधून चंदनिकाने प्रशिक्षणात चांगला सराव केला व आयोजकांचे लक्ष वेधले.

 प्रशिक्षणाबद्दल चंदनिका म्हणाली, दुबई, काश्मीर, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, पंजाब, मुंबई अशा विविध भागांतून आलेल्या व्यावसायिक स्पर्धकांसोबत सराव करताना आपल्यात काही कमी नाही याची जाणीव झाली. छोट्या गावातून आलेली मी काही करू शकणार नाही अशा काही शहरी स्पर्धकांच्या भावना होत्या. मात्र मी माझ्या परफॉर्मन्सवर फोकस केला. नृत्य, कॅटवॉक, टॅलेंट यावर भर दिला. उंच टाचांच्या सँडलवर ‘कॅटवॉकङ्कचा सराव करताना अनेकदा पाय दुखावले. परंतु जिद्द कमी पडली नाही. ‘परफॉर्मन्स पाहून आयोजक खूश झालेत.