अवैध व्यावसायिकांवर कारवाई करून २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त, ८ आरोपी ताब्यात

December 03,2020

गोंदिया : ३ डिसेंबर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत याप्रकरणी ८ आरोपींना ताब्यात घेतले असून १० आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर कारवाई जिल्ह्यातील डुग्गीपार, गोंदिया ग्रामीण व गंगाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत केली.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायांना ऊत आले आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असून काहींचे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अवैध व्यवसायींकाविगरूद्ध वाढत्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाèया नागरा येथे पथक गस्तीवर असताना नागरा निवासी मुन्ना तीरत हा सहकाèयांना एकत्र घेऊन जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पथकाने छापामार कारवाई करून आरोपी राजेश लिल्हारे (६१), दीपक पाचे (२८), किशोर डोंगरे (४७), कन्हैया बनकर (३१), मुकेश कुंडभरे (३४), शेख कबीर शेख हबीब (५८) यांना ताब्यात घेतले. दरम्यान मुख्य आरोपी मून्ना तीरत याच्यासह अन्य चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींच्या ताब्यातून १४ हजार ८८० रुपये रोख, जुगाराचे साहित्य, २७ हजार ५०० रुपये किमतीचे ६ मोबाईल आणि ६० हजार रुपये किमतीची दुचाकी असा १ लाख २ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

 दुसरी कारवाई डुग्गिपार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील डव्वा येथे केली. डव्वा येथील पाण्याच्या टाकीजवळ काही इसम जुगार खेळतांना आढळले. यावेळी आरोपी रामेश्वर कुरसंगे (४८), मुकेश अग्रवाल (५०), मुनेश्वर देवरे (५८) यांना ताब्यात घेतले तर अन्य पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींच्या ताब्यातून १७ हजार ६१० रुपये रोख, जुगाराचे साहित्य, मोबाईल असा २६ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तिसरी कारवाई गंगाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पांगळी येथे केली. पांगळी येथील आरोपी संदीप वट्टी (२९) हा स्वतःच्या घरी दारू गाळत असल्याची माहिती पथकाला मिळाली. यावेळी पथकाने धाड कारवाई केली असता त्याच्या घरून दारू गाहण्याचे साहित्य, मोहफुल, मोहफुल दारू असा एकूण १ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. वरील तिन्ही कारवाईत पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस कर्मचारी कमलजीतसिंह भाटिया, अर्जुन कावळे, सोमेंद्र तुरकर, रेखलाल गौतम, तुळशीदास लुटे, रियाज शेख, महेश मेहर, नेवाल भिलावे, इंद्रजीत बिसेन, रॉबिन साठे, विनोद गौतम, चित्तरंजन कोडापे, विठ्ठल ठाकरे, चेतन पटले, अजय रहांगडाले, राजेंद्र मिश्रा आदींनी केली.