ट्रकच्या चकमध्ये आल्याने ट्रकचालकाचा मृत्यू

December 03,2020

यवतमाळ : ३ डिसेंबर - कोळसा भरलेल्या ट्रकच्या चाकामध्ये आल्याने ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी १२:३0 वाजताच्या सुमारास उकनी खदानीच्या चेकपोष्टजवळ घडली. मारोती सुनील वरवाडे (२४) रा. शिरपूर असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

उकनी खदानीतून वणीरेल्वे सायडिंगवर कोळसा भरून येत असलेल्या डीटिसी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गाडीच्या चाकांखाली आल्याने त्याच गाडीच्या ड्रायव्हरचा दुर्दैवी अंत झाला. डीटिसी कंपनीचा ट्रक (क्र. एमएच ३४ एबी ४५६५) उकनी खदानीतून कोळसा भरून चेकपोष्टवर एन्ट्री करण्याकरिता ड्रायव्हरने उभा केला. एन्ट्री करून ड्रायव्हर गाडीकडे येत होता. दरम्यान, दुसरी खाली गाडी अचानक चेकपोष्टकच्या दिशेने येत होती. ते पाहून रस्ता अरुंद असल्याने समोरून येणार्या ट्रकपासून बचाव करण्यासाठी सदर ड्रायव्हर बचावाकरिता गाडीखाली गेला. मात्र याचवेळी उभी गाडी ढुलकल्याने गाडीच्या चाकामध्ये दबून मारोती सुनील वरवाडे या ट्रक चालक युवकाचा करून अंत झाला.

उकणी चेकपोष्टकडे जाणारा रस्ता अगदीच अरुंद असून खदानीत जाणार्या गाड्या सुसाट वेगाने धावतात. चेकपोष्टवर नेहमी गाड्यांची वर्दळ रहात असून गाड्या नियमबाह्य पद्धतिने उभ्या असतात. ट्रिप मारण्याच्या धुंदीत ट्रक चालक अती वेगाने गाड्या चालवीत मिळेल त्या जागी गाडी घुसवीन्याचा प्रयत्न करित असल्याने खदानीत गाड्या नेहमीच एकमेकांना भिडत असतात. ट्रिप मारण्याचे दिलेले टारगेट ड्रायव्हरांमध्ये स्पर्धा निर्माण करत असून याच स्पर्धेतून खदान प्रशासनाच्या दुर्लक्षिततेमुळे अपघात वाढु लागले आहेत. खदानीतील चेकपोष्ट जवळील अरुंद रस्ते व आडवी तिडवी उभी असणारी वाहने अपघाताना निमंत्रण देत असून अपघातात चालकांचे नाहक बळी जात आहे.