अवैध रेती वाहतूक करणारी ५ वाहने पकडली, ५२ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

December 03,2020

बुलढाणा : ३ डिसेंबर - अवैध रेती वाहतूक करणार्या पाच वाहनांना पकडून तब्बल ५२ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

शेगावात तालुक्यात अनेक दिवसांपासून नदी, नाल्यातून रेती तस्कर अवैधरित्या रेतीचा उपसा करुन रेती तस्करी करत होते. दरम्यान एसडीपीओ यांच्या पथकाने मागील तीन ते चार दिवसात धडक कारवाई करत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारी पाच वाहने पकडली. यामध्ये चालक हनिफ खान सबदर खान हा मालवाहक टाटा ४0७ क्र. एम. एच. २८ / बी. बी. ३२१८ मध्ये अवैधरित्या दीड ब्रास रेती, शेख सलीम शेख हाशीम रा. माटरगाव हा टाटा ४0७ क्र. एम. एच. २८ / बी. बी. ३0९८ मध्ये अवैधरित्या दीड ब्रास रेती, विजय प्रकाश बाभूळकर हा मालवाहक लेलॅन्ड १२१२ वाहन क्र. एम. एच. २८ / बी. बी. ७९0९ मध्ये २ ब्रास रेती, ज्ञानेश्वर दिनकर कराळे हा मालवाहक लेलॅन्ड १२१२ वाहन क्र. एम. एच. २८ / बी. बी. ९४९४ मध्ये दोन ब्रास रेती, गणेश दत्तुजी चोखंडे रा. शेगाव हा मालवाहक लेलॅन्ड १२१२ वाहन क्र. एम. एच. २८ / बी. बी. १३६७ मध्ये २ ब्रास रेती अवैधरित्या घेऊन जाताना मिळून आला. 

एसडीपीओ पथकाने पाचही वाहने ताब्यात घेऊन शेगाव व खामगाव तहसील कार्यालयात जमा केली आहेत. उपरोक्त पाचही वाहनांमधून साडे आठ ब्रास रेती व वाहन, असा एकूण ५२ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई एसडीपीओ अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप देशमुख, कलीम बेग, पोना सुधाकर थोरात, शांताराम खाळपे, अमित चंदेल, प्रवीण शेगोकार, नितीन भालेराव यांनी केली.