देशी दारूच्या भट्टीवर धाड, ४ अटकेत

December 03,2020

भंडारा : ३ डिसेंबर - अड्याळ पोलिस स्टेशनचे  सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील यांनी पथकासह धाड घालून भावड येथील देशी दारूच्या भट्टीवर धाड घालून चार जणांना वाहनासह ताब्यात घेतले. ही कारवाई सकाळी ५.३0 वाजता करण्यात आली. 

अड्याळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील, पोलीस अंमलदार नवरखेडे, जितेंद्र हरीचंद्र वैद्य, चालक पोलीस नायक भुते यांनी गुप्त माहितीच्या आधारे मौजा भावड गावाजवळील देशी दारूचे भट्टीजवळ धाड घातली असता आरोपी प्रदीप पंढरी टापरे (२५) रा. सोनी (चपराळ ) लाखांदूर, पंकज संपत तुमसरे (३0) रा. नेताजी वार्ड पवनी, माधवराव सदाशिव लाडे (५0) रा. भावड ता. पवनी, राजेंद्र दामोधर मिसार (२८) रा. खानपुरा ता. अर्जनी मोरगाव (गोंदिया) यांचे वाहन क्र. एम. एच. ३१ सी. पी. ७१0६ ची तपासणी केली असता खरड्या अवैधरीत्या विनापरवाना देशी दारुची वाहतुक करतांना मिळून आले. अड्याळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

सदर कारवाईजिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव, अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील, पोलिस अंमलदार नवरखेडे, जितेंद्र हरीचंद्र वैद्य व चालक पोलीस नायक भुते यांनी केली.