गरम दुधाचा गंज अंगावर पडून ३ वर्षीय बालकाचा जळून मृत्यू

December 03,2020

भंडारा : ३ डिसेंबर - गरम दुधाचा गंज अंगावर पडून ३ वर्षीय बालकाचा जळून मृत्यू झाल्याची घटना पेट्रोलपंप ठाणा येथे घडली. समर सचिन ठाकरे (३) रा. आंबेडकर वार्डपेट्रोलपंप ठाणा असे मृत बालकाचे नाव आहे. तो घरी खेळत असताना दुधाच्या गंजाला धक्का लागला. गरम दुध अंगावर पडल्याने तो ६0 टक्के भाजला. त्याला नागपूर येथे उपचारार्थदाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जवाहरनगर पोलिसांनी मर्ग  नोंद केला असून पुढील तपास पोलिस हवालदार जांभुळकर करीत आहेत.