लग्न तुटण्याच्या भीतीने युवकाने घेतला गळफास

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - लग्न तुटण्याच्या भीतीने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उमरेड पोलिस स्टेशन हद्दीत चारगाव (मुंगलाई) येथे घडली. अमोल शेषराव मानकर (२४) असे मृतकाचे नाव आहे. अमोलचे एका स्थानिक मुलीशी प्रेमसंबंध होते. परंतु, कौटुंबिक कारणाने तिच्याशी त्याचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतर दुसर्या मुलीशी लग्न जोडून साक्षगंध केले. परंतु, लग्न जुळलेल्या मुलीला अमोलच्या जुन्या प्रेमसंबंधाबाबत माहिती मिळाल्याने लग्न तुटण्याच्या भीतीने  पहाटे ४ वा. सुमारास सिलिंग फॅनच्या हुकला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शेषराव संपत मानकर रा. चारगाव (मुंगलाई) यांनी उमरेड ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.