विवाहितेची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी

November 29,2020

नागपूर : २९ नोव्हेंबर - हुंड्यासाठी 24 वर्षीय विवाहितेची हत्या करणार्या आरोपीस चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेतील आरोपींमध्ये पती नागेंद्र देवांगण यांच्यासह दीर रवी देवांगण, सासू सुभद्रा देवांगण व सासरा किसनलाल देवांगण यांचा समावेश आहे.

 महानगरातील बाबुपेठ परिसरातील जुनोना चौकालगतच्या बिरसा मुंडा चौकात वास्तव्य करणार्या देवांगण कुटुंबियांनी हुंड्यासाठी 24 वर्षीय नेहा देवांगण हिचा छळ केला. घटनेच्या दिवशी संगनमत करून आरोपींनी तिची गळा दाबून हत्या केली. आपल्यावर कुणाचा संशय येऊ नये, यासाठी मृतक नेहाला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले.पण, डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले. मृतक विवाहितेचे शवविच्छेदन केले असता, तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणाची माहिती रूग्णालय प्रशासनाने रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादंवी 498, 302, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला. अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याना 30 नोव्हेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक प्रकाश हाके यांच्या नेतृत्वात रामनगर पोलिस करीत आहेत.