चंद्रपुरात आग लागण्याचे सत्र सुरूच

November 25,2020

चंद्रपूर : २५ नोव्हेंबर - चंद्रपूर शहरात आग लागण्याचे सत्र सुरूच असुन भर बाजारातील दुकानांना आग लागत असुन त्यातही फळांची दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेमकी फळांच्या दुकानात आग लागण्याचे प्रकार घडत असल्याने संशय बळावत असून ही आग लागते की मुद्दाम लावल्या जाते याचा शोध घेणे आवश्यक आहे. मागील ६ महिन्यापासून शहरात अनेक ठिकाणी आग लावण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 

मंगळवारी सकाळी अंदाजे पाच वाजताच्या दरम्यान गोल बाजार येथील अनुक्रमे अब्दुल सलाम व निसार या दोघांच्याही दुकानात अज्ञात इसमाने आग लावली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. 

सदर आगीत अंदाजे ३0 हजार रु.चे नुकसान झाले असून यापूर्वी याच दुकानासमोरील फळांच्या दुकानात आग लावण्यात आली होती तर आजसुद्धा लागलेली आग नेमकी फळांच्या दुकानात लागली आहेत. या पूर्वी गोलबाजारात 3 ठिकाणी आग लागली असुन प्रत्येक वेळी घटनेची पोलिसात तक्रार देण्यात आली असूनही आजपयर्ंत आरोपीचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अटक करा अशी मागणी परिसरातील व्यापार्यांनी केली आहे.