चंद्रपुरात दारूची वाहतूक करतांना ४ आरोपी अटकेत, ५ आरोपी फरार

November 25,2020

चंद्रपूर : २५ नोव्हेंबर - भद्रावती तालुक्यातील तेलवासा परिसरात दारूची वाहतूक करीत असताना चार आरोपींना दारूसाठय़ासह ताब्यात घेतले. यातील पाच आरोपी फरार झाले.

समीक्ष संजय बारेकर (वय २१) रा. किल्ला वॉर्ड, राकेश केळझळकर (वय २४) रा. फुकटनगर, शुभम धाबेकर (वय २0) रा. गवराडा, बंडू रामटेके (वय ४५) रा. सुमठाणा अशी अटक झालेल्या आरोपींची नावे असून महेश वाकडे, मंगेश कामतवार, रितीक जांभूळकर अशी फरार आरोपींची नावे आहेत. 

हे वनी मार्गे तेलवासा गावातून देशी दारू घेऊन येत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, भद्रावती गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त ही कारवाई केली. त्यांच्याकडून ६ लाख १२ हजारांचा देशी दारूसाठा व वाहने जप्त करण्यात आली. ही कारवाई संजय आकनुलवार, हेमराज प्रधान, केशव चिटगीरे यांनी केली.