बाईकचोरी प्रकरणी तीन अटकेत

November 25,2020

बुलढाणा : २५ नोव्हेंबर - मलकापूर शहर पो. स्टे. हद्दीतील चंदन नगरातील रहिवासी सागर संतोष खोलगडे यांची टीव्हीएस व्हिक्टर कंपनीची मोसा क्रमांक - एम एच १ ९ एक्स १७७६ ही दि. १७ नोव्हेंबर रोजी त्याचे घरासमोरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने मलकापूर शहर पो.स्टे. अप नं. ६३२/२0२0 कलम ३७ ९ , ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

मलकापूर शहर पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकरी व कर्मचारी यांनी सदर गुन्ह्य़ाचा सखोल तपास करुन दि. १९ नोव्हेबर रोजी मलकापूर येथील वानखेडे पेट्रोलपंपाजवळ सापळा लावून सदर गुन्ह्य़ातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी नामे शहबाज खान अयास खान रा. जवाईनगर मलकापूर, अफताब खान हशमत उल्ला खान रा.सायकल पुरा मलकापुर, हरुन खान सहीद खान रा. मालवीयपुरा मलकापूर यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्य़ात चोरीस गेलेली मोसा १. टीव्हीएस व्हिक्टर कंपनीची मोसा क्र. एम.एच. १९ एक्स १७७६ कि अंदाजे २५,000 रु.ही जप्त केली तसेच मलकापूर शहर परिसरातून आणखी तीन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे कडुन २. काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटर सायकल चेचीस नंबर २२/ ५३१६ ९ कि. अंदाजे -५0,000 / -रु., काळया रंगाची हिरो पॅशन प्रो चेचीस नंबर- १0/00६ ९ ५ किं. अंदाजे ३५,000 / -रु , काळया सिल्व्हर रंगाची हिरो होंडा ग्लॅमर चेचीस नंबर- 0९ ३५0६ किं. अंदाजे २0,000/- रु असा एकूण १,३0,000/- रुपये किंमतीच्या चार मोटर सायकल जप्त केल्या सदरची कार्यवाही अरविंद चावरीया पोलीस अधिक्षक बुलडाणा, हेमराजसिंह राजपुत,अपर पोलीस अधिक्षक,खामगाव,दिलदार तडवी उपविभागिय पोलिस अधिकारी मलकापुर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पो.स्टे.चे सपोनि श्रीधर गुट्टे, सफो. रतनसिंह बोराडे, नापोका अमोल शेले, नापोका संजय वेरुळकर , पोका . समाधान ठाकुर , ईश्वर वाघ, सलिम बरडे, अनिल डागोर, गोपाल तारुळकर, प्रकाश जाधव, पंकज वराडे यांनी केली आहे