भंडाऱ्यात अवैधपणे सुरु असलेल्या मोहफूल दारूभट्टीवर धाड

November 25,2020

भंडारा : २५ नोव्हेंबर - कारधा पोलिसांनी मंगळवारी सकाळी वैनगंगा नदी काठावर धाड घालून अवैधरित्या सुरू असलेली रनिंग मोहफुल दारूभट्टी उध्वस्त केली. 

कारधा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वानखेडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड घातली असता वैनगंगा नदीकाठावर सुरू असलेली रनिंग दारूभट्टी उध्वस्त केली. 

अमित भाऊराव शेंडे (३९) रा. टेकेपार/पुनर्वसन याला अटक करून त्याच्या ताब्यातून ५९,७00 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीवर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाईजिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव व अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात कारधा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वानखेडे यांचे अधिनस्त पथकातील क्रांतीष कराडे यांनी केली.