बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

November 25,2020

बुलढाणा : २५ नोव्हेंबर - दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम त्वरित जमा करण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकारने शेतकर्यांना दिले होते. मात्र सरकारने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे जो पर्यंत उर्वरित रक्कम शेतकर्यांच्या खात्यात तात्काळ जमा होणार नाही, तो पर्यंत जिल्हाधिकार्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरूच राहील अशी आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर मंगळवार सकाळी 11 वाजेपासून शेतकर्यांसह ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची भेट घेऊन रविकांत तुपकर यांनी शेतकर्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा केली. अंतिम आणेवारी काढताना वस्तुनिष्ठ आणेवारी काढण्यात यावी. या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी शेतकर्यांसह ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.या ठिय्या आंदोलनात राणा चंदन, शे.रफिक शे. करीम, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, ज्ञानेश्वर कल्याणकर, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, राजेश गवई, दत्ता पाटील, विजय बोराडे,कडूबा मोरे, रामेश्वर पवार, रामेश्वर अंभोरे, आकाश माळोदे, गजानन गवळी,मारोती मेढे,जबिर खान,मनोहर उमाळे, वसुदेव मेढे, लवेश उबरहंडे यांच्यासह शेतकरी व स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.