धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस

November 25,2020

गोंदिया : २५ नोव्हेंबर - धान उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीप्रमाणे यंदाही खरीप हंगामात धानाला प्रति क्विंटल सातशे रुपये देऊ अशी ग्वाही राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकèयांना दिली होती. त्याच्या आश्वासनाची पूर्तता झाली असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने धानाला सातशे रुपये बोनस देण्याचे राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत जाहीर केले आहे.

पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. त्यात गोंदिया व भंडारा हे दोन्ही जिल्हे केवळ धान उत्पादक जिल्हे आहेत. या जिल्ह्यांची अर्थ व्यवस्था प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. मागील तीन-चार वर्षापासून धानाचा लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र त्या तुलनेत धानाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. याचीच दखल घेत लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकèयांना २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळवून देण्याची घोषणा मागील वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गोंदिया येथे खा. प्रफुल्ल पटेल यांनी केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर धानाला प्रति क्विंटल सातशे रुपये प्रथमच बोनस जाहीर करण्यात आला. त्यामुळे शेतकèयांना २५०० रुपये हमी भाव मिळाला. मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने आणि बोनस जाहीर केल्यास सरकारच्या तिजोरीवर १४०० केटी रुपयांचा भार येणार होता. त्यामुळे यंदा बोनस मिळणार की नाही याची शंका होती. मात्र राज्यसभा सदस्य पटेल यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही धानाला बोनस दिला जाईल अशी ग्वाही शेतकèयांना दिली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर धानाला बोनस जाहीर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. आता सरकारने धानाला प्रति क्विंटल सातशे रुपये बोनस जाहीर केला आहे. याचा लाभ पूर्व विदर्भातील शेतकèयांना होणार आहे. त्याबद्दल शेतकèयांनी खा. पटेल यांचे आभार मानले आहे.