अशोक धवड अखेर जामिनावर सुटले

November 25,2020

नागपूर : २५ नोव्हेंबर - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माजी आमदार अशोक शंकरराव धवड यांना सशर्त जामीन मंजूर केला. नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप धवड यांच्यावर आहे. ते बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्वाळा दिला.

यापूर्वी धवड यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापयर्ंत धाव घेतली होती. परंतु, त्यांना कुठेच दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी ५ नोव्हेंबर २0१९ रोजी आत्मसर्मपण केले होते. तेव्हापासून ते कारागृहात होते. २0१५-१६ व २0१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये बँकेत ३८.७५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे. धवड यांनी गहाण मालमत्तांचे मूल्य वाढवून मोठमोठी कर्जे मंजूर केली. तसेच विविध कारणांसाठी व्हाऊचरद्वारे बँकेच्या तिजोरीतून ८९ लाख ११ हजार ४६९ रुपये काढून घेतले. त्यांनी कर्ज मंजूर करताना अर्जदारांच्या कागदपत्रांची योग्य तपासणी केली नाही. यासह अनेक गैरप्रकार केल्याचे धवड यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २0१९ रोजी उप-लेखापरीक्षक श्रीकांत सुपे यांच्या तक्रारीवरून धवड यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२0, ४0६, ४0९, १२0-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-ए, एमपीआयडी कायद्यातील कलम ३ व आयटी कायद्यातील कलम ६५ व ६५(ब) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवला यांच्या खंडपीठाने सर्शत जामीन मंजूर केला.धवडतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, अँड. देवेंद्र चव्हाण व अँड. चैतन्य बर्वे यांनी बाजू मांडली.