कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी ः आशीष शेलार

November 21,2020

एखादी कर्तृत्ववान मराठी स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग मराठा समाजात आहे. असे झाले तर माझ्यासारख्या माणसाचेही त्याला समर्थन असू शकते, अशी अपेक्षा भाजपचे आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली. शेलार यांनी जाहीरपणे व्यक्त केलेल्या या अपेक्षेनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

कर्तृत्ववान मराठा स्त्रिया या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार व आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी शेलार बोलत होते. सर्वच मान्यवरांनी यावेळी पुस्तकातील स्त्री चरित्रांचा आढावा घेतला. विद्वतेचा ठेका हा केवळ मुंबई-पुणेकरांनी घेतला आहे. असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे साहाजिकच बुलडाणा सारख्या परिसरातील विद्वान वा जाणकारांची नोंद अनेकदा घेतली जात नाही.

ती या पुस्तकात घेण्यात आली  आहे, याबद्दल शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी पुस्तकावर बोलताना जातीव्यवस्थेवर परखड भाष्य केले. आमदार आशिष शेलार यांनी पुस्तकाचा विषय आणि आशयाचे कौतुक केले.