बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याने केली आत्महत्या

November 21,2020

लग्नाचे बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्यापूर्वीच नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील शिंगोरी तालुक्यात घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, नीलेश कोहळे हा युवक घरून सायंकाळच्या वेळेस गेला होता. तो रात्री परतला नसल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळून आला नाही. ममदापूर शेतशिवारातील एका शेतात नरेश पारधेकर यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या नीलेशचा मृतदेह दिसून आला. नीलेश कोहळे हा विद्युत सहायक म्हणून कार्यरत होता. पुढील महिन्याता त्याचा विवाह होणार होता. परंतु विवाहापूर्वी त्याने आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. नीलेशच्या वडिलांंच्या नावाने 6 एकर शेती होती. ती शेती नीलेश सांभाळत होता. गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे तो चिंताग्रस्त असल्याचे सांगण्यात येत होते. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते.