उसाच्या शेतीच्या आड केली गांजाची लागवड, २१ लाखाचा गांजा जप्त

November 19,2020

वाशीम : १९ नोव्हेंबर - हिंगोली जिल्ह्यातील हट्टा पोस्टे अंतर्गत येत असलेल्या म्हैसापूर येथील एका शेतकर्‍याने उसाच्या शेतीच्या आड गांजाची लागवड केल्याच्या माहितीवरुन हिंगोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 क्विंटल 73 किलो गांज्याची 345 झाडे जप्त केली असून, त्याची किंमत आंतराष्ट्रीय बाजारपेठेत 21 लाख 87 हजार रुपये असल्याचे पोलिस सूत्रांनी माहिती दिली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार हिंगोली जिपोअ राकेश कलासागर यांनी पदभार स्विकारताच सर्व ठाणेदार व स्थागुशा यांना जिल्ह्यातील अवैध धंदेबाबत माहिती काढुन त्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करणेबाबत आदेशित केले होते. याबाबत हट्टा पोस्टे चे सपोनि जी. के. मोरे यांना गुप्त माहिती मिळाली की, मौजे हापसापुर येथील नामदेव सुर्यभान सवंडकर याने त्यांचे वडीलाचे नावे असलेल्या शेतात शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाची झाडाचे स्वतःचे फायद्याकरीता विक्री करण्याचे उद्देशाने लागवड केलेली आहे. यावरुन हिंगोली जिपोअ राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांचे अधिपत्याखाली सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जी. के. मोरे, सपोनि एस. ए. गोपिनवार यांचे पथकाने दोन शासकीय पंच, कृषि सहायक, फोटो ग‘ाफर, वजन मापारी, पोलिस पथक यांचेसह माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा मारला असता नामदेव सुर्यभान सवंडकर याने त्यांचे वडीलाचे नावे असलेल्या शेतात काणास दिसु नये किंवा माहिती मिळु नये म्हणुन छुप्या पद्धतीने उसाचे पिकात शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गांजाचे एकुण 273.400 किलो वजनाची 345 झाडे किंमत सुमारे 21 लाख 87 हजार 200 रुपये लागवड केल्याचे मिळुन आल्याने सदरचा गांजा दोन शासकीय पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन जप्त करण्यात आला.