बच्चेकंपनी देतेय निखळ मनाने दिवाळी साजरी करण्याचा संदेश

November 13,2020

नागपूर : १३ नोव्हेंबर - दिवाळीच्या बाजारात काही प्रमाणात उत्साह निर्माण झाला असला तरीही यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमधील विव्हळीबद्दलचा उत्साह जरा कमीच दिसून येत आहे. त्यात लॉक डाऊन मुळे कित्येकांचे व्यवसाय ठप्प होते. काहींचे रोजगारही हिरावले गेले. परंतु यात बच्चे कंपनी  मात्र सर्वात सुखी आणि लॉक डाऊनचा खरा आनंद बच्चे कंपनीने लुटला. आता तर त्यांचा आवडता सण दिवाळी आहे आता तर बालगोपाळांचा आनंदाला उधाण आले आहे. त्यातच सरकारने मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आणली असली तरीही किल्ले बनविण्याचा आनंद त्यांच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. 

आमच्या नागपूर इन्फोचे छायाचित्रकार  रजत बानकर  यांनी नुकतेच बच्चे कंपनीचा हा उत्साह आपल्या कॅमेऱ्यामध्ये शीतरीत करून  लोकांच्या नजरेत आणण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण नागपूरच्या  शताब्दी चौकातून थोडं पुढे गेल्यावर रामटेके नगर या वस्तीतील लहान मुलांचे किल्ले बनवितानाचा हा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांना या खेळात कोरोनाची भीती नाही किंवा कसलीही चिंता नाही. 

नागपूर शहरात किल्ले बनविण्याचा इतिहास आहे फटाके फोडण्यासाठी नागपुरात दरवर्षी दिवाळीच्या तोंडावर फटाके फोडण्यासाठी मातीचे किल्ले उभारतात. नागपूर शहरात या काळात भरपूर किल्ले उभारण्याच्या स्पर्धाही भरलवाल्या जातात. परंतु या मुलांना स्पर्धेपेक्षाही आनंद महत्वाचा आणि तोच आनंद आमचे छायाचित्रकार रजत बानकर यांनी सर्वांना दाखवून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.