वानती श्रीनिवासन भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष

October 29,2020

नवी दिल्ली : २९ ऑक्टोबर - तामिळनाडूच्या वानती श्रीनिवासन यांची भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमिताभ चक्रवर्ती यांच्याकडे यांच्याकडे पश्चिम बंगाल भाजपचे संघटन महामंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. विजया  रहाटकर यांच्या जागेवर  वानती श्रीनिवासन यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. विजया रहाटकर यांना भाजपच्या राष्ट्रीय मंत्री म्हणून दायित्व देण्यात आले आहे. वानती यांनी तामिळनाडू विधानसभेची निवडणूक लढवली आहे. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. २०११ मध्ये तामिळनाडू विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्या पृष्टीभूमीवर  वानती यांच्या नियुक्तीला महत्व आहे. यापूर्वी भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कर्नाटकचे खासदार तेजस्वी सूर्य यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष तेलंगणातील डॉ. के. लक्ष्मण आहेत. अशा रीतीने भाजपच्या तीन महत्वाच्या मोर्चाचे अध्यक्ष आता दक्षिण भारतातील झाले आहेत.