बिहार निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ५३ टक्के मतदान

October 29,2020

नवी दिल्ली : २९ ऑक्टोबर - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी  मतदान झाले. पहिल्या टप्प्यात एकूण ७१ जागांसाठी मतदान झाले. काही ठिकाणी सुरवातीला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये समस्या आल्या. पण नंतर पुन्हा मतदानाला वेग आला. राज्यात संध्याकाळी ६ वाजेपयर्ंत ५३ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. तर राजधानी पाटणामध्ये ५२.५२ टक्के मतदान झाले. बिहारमध्ये होत असलेल्या मतदानावर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आम्हाला सुरक्षित निवडणुका घ्यायच्या आहेत. बिहारच्या नागरिकांनी सर्व सूचना पाळल्या आणि मतदान केले, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले.

कोरोना संकटात मतदानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. सावधगिरीने मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी, तेजस्वी यादव, नितीशकुमार यांनी नागरिकांना केले. पहिल्या टप्प्यात एकूण १0६६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून २.१४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.

बिहारमधील मतदानावर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपयर्ंत ५१.२४ टक्के मतदान झाले आहे. यापूर्वी २0१५ मध्ये ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. या वेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आम्हाला सुरक्षित निवडणुका घ्यायच्या आहेत. बिहारच्या नागरिकांनी सर्व सूचना पाळल्या आणि मतदान केले, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले.