आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

October 29,2020

नागपूर : २९ ऑक्टोबर - मागील, २१ ऑक्टोबर रोजी यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीतील टिपू सुलतान चौक, प्लॉट नंबर ९२, नागपूर येथे राहणार्या शाहिना शेख मोमीन शेख (वय २१ वर्ष) यांनी आपल्या घरी सिलिंग फॅनला दुपट्टय़ाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आरोपी मोमीन मोहम्मद अली शेख (वय २५ वर्ष), मो. अली वल्द नूर हसन शेख (वय ५१ वर्ष) जोहरा बेगम मो. अली शेख वय ५0 वर्ष), मीर अली मो. अली शेख (वय ३0 वर्ष), समीरा मीर अली शेख (वय २५ वर्ष), समिरन शेख (वय ३२ वर्ष) सर्व रा. टिपू सुलतान चौक, प्लॉट नंबर ९२, नागपूर यांनी संगनमत करून शाहिना यांचे लग्न झाल्यापासून शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच शाहिना यांनी ज्या दिवशी गळफास घेतला त्याच दिवशी काही वेळापूर्वी सुध्दा आरोपीतांनी शाहिनासोबत व फिर्यादी शबाना परविन जलील बेग (वय ३१ वर्ष, रा. गौरीनगर, गणेश किराणा स्टोअर्सच्या बाजुला, नागपूर) यांच्याशी सुध्दा भांडण करून तिला माहेरी जाऊ दिले नाही. तिला धमकावून छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरा पोलिसांनी आरोपींविरूध्द कलम ३0६, ४९८ (अ), ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.