घरासमोरून सायकली चोरून नेणाऱ्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

October 29,2020

चंद्रपूर : २९ ऑक्टोबर - भद्रावती शहरातून नवीन खरेदी करून आणलेल्या सायकली घरापासून चोरून नेणार्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्यावर बाल गुन्हेगार कायद्याअंतर्गत कारवाई केली.

नगर परिषद बाजूला आशिष सारडा यांच्या घरासमोरून दोन दिवसांपूर्वी खरेदी करून आणलेली सायकल चोरीस गेली या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल करण्यात आली पोलिसांनी सुमठाणा परिसरातून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून शहरातून चोरी केलेल्या दोन नवीन सायकल किंमत १४ हजार व या कामाकरता वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, हेमराज प्रधान, केशव चिटगिरे, शशांक बदामवार, निकेश ढेंगे यांनी केली.