कृषी विधेयक संमत करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून दिले - अनिल बोन्डे

October 29,2020

बुलढाणा : २९ ऑक्टोबर - भारत देश गुलामीतून स्वतंत्र झाला. मात्र, शेतकरी शासनकर्त्याच्या जाचक अटिमुळे गेल्या अनेक वर्षांपासून पारतंत्र्यांतच वावरत होता. देशाचे पतंप्रधान नरेद मोदी यांच्या इच्छाशक्ती व कर्तत्वाच्या जोरावर केद सरकारने नवीन कृषी विधेयक संमत करून शेतकर्यांना खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळून दिले आहे. शेतकर्यांना त्यांचा शेतमाल कुठेही, केव्हाही, कोणालाही हवा त्या भावात विकण्याचे स्वातंत्र्य या विधेयकामुळे मिळणार असल्याचे महाराष्ट राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी  स्थानिक विर्शाम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी आ. चैनसुख संचेती, सागर फुंडकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, संतोष देशमुख, भाजपा तालुक्याध्यक्ष विजय भालतिडक, मोहन शर्मा, राजेश अगवाल,आदीं उपस्थित होती. पूढे बोलताना मंत्री बोंडे यांनी सांगितले की, विरोधकांनी शेतकर्यांची दिशाभूल करण्याकरीता केवळ विरोधाला विरोध म्हणून शेतकरी व कामगार विरोधी कायदा असल्याचे भासून भ्रामक आंदोलन सुरू केले आहे. वास्तविक जे कायदे संसदेत संमत होत आहे, ते काँग्रेसच्या जाहिरनाम्यात समाविष्ट आहे. त्यांचा जाहीरनामा भाजपा सरकार पूर्ण करतेय म्हणून त्यांच्या जिव्हारी लागत आहे. 

या कायद्याबाबत जनजागृती करण्याकरिता ही पत्रकार परिषद बोलाविल्याचे सांगितले. नवीन कृषी कायद्यात स्वामिनाथन समितीचा अहवाल लागू करून शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील समितीने सूचविलेल्या सूचनांच्या आधारे निर्णय घेऊन शेतकर्यांची अनेक दिवसांच्या मागणीची पूर्तता नवीन कृषी कायद्यामळे होत असल्याने सर्व सामान्य शेतकरी मात्र आनंदित आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भातून शेतकरी पंतप्रधान यांना धन्यवाद लिहूून पत्र पाठविण्याची मोहीम सुरू करणार असल्याचेही बोंडे यांनी सांगितले.